ऑक्टोबर १६ २००६

एका रम्य संध्याकाळी...

एका रम्य संध्याकाळी.. दूर क्षितिजावर सूर्य अस्तास जावा, संधिप्रकाश पसरलेला... आकाशात मुक्तहस्ते रंगांची उधळणं व्हावी.. पक्षांचे थवे घरट्याकडे परतत असावेत.. आणी मन तुझ्या आठवणींनी व्याकुळ व्हावं..

मंद वाऱ्याची झुळुक हलकेच गुदगुल्या करत असावी... आणी उगीचच खुदकन हसू यावं..

अचानक एखादी सुरेखशी कल्पना सुचावी.. आणी त्या मनस्थितीत शब्दही अप्रतिम उमटावेत.. 

तुझ्या आठवणीत मग्न असताना आपोआपच ओठांवर धुन यावी..

"कही दूर जब दिन ढल जाये

 सांझ की दुल्हन बदन चुराये

 चुपकेसे आये

 मेरे खयालों के आंगन मे

 कोई सपनो के दीप जलाये, दीप जलाये...कही दूर..!!! "

धुन संपताना नकळतच आलेले दोन अश्रू मग हलकेच पुसून टाकावेत...

तुझी आठवण येत असताना हे सारे असेच व्हावे.. एका रम्य संध्याकाळी.....

 

अशी एखादी संध्याकाळ तुम्ही अनुभवली आहे?



नेहमीच !
मूळ लेखकाचा उल्लेख?
सहमत
आणखि एक छान गाणे.
अशीच एक गझल ...
सही रे......

Typing help hide