ऑक्टोबर १७ २००६

पंजाबी समोसा

जिन्नस

  • ८,१० उकडलेले बटाटे,७,८ हिरव्या मिरच्या,१इंच आलं,३ टी-स्पून धने
  • १.५ टी-स्पून जीरे,३,४ दालचिनीचे तुकडे,२,३ लवंगा,२,३ वेलदोडे
  • ८,१० काळी मिरी,०.५ टी-स्पून आमचूर,१ वाटी उकडलेले वाटाणे
  • ३०० ग्राम मैदा,७५ ग्राम तूप+२ टी-स्पून तूप,१ टी-स्पून मका-पीठ(कॉर्न फ्लोअर)
  • १टी-स्पून लिंबाचा रस,मीठ चवीनुसार,कोमट पाणी,तेल तळणीसाठी
  • १ मूठ कोथिंबीर

मार्गदर्शन

आले+मिरची पेस्ट करा,धनेजीरे,मिरे, दालचिनी,लवंगा,वेलदोडे इ.मसाला भाजून न घेता कच्चेच भरड वाटा,अगदी थोड्या तेलावर परतून घ्या,त्यात आले मिरची चे वाटण घाला,बटाटे बारीक चिरा व ते यात घाला,वाटाणे घाला,मीठ घाला,भाजी परतून घ्या,आमचूर टाकून गॅस बंद करा व चिरलेली कोथिंबीर घाला.

२ चमचे तूप+३/४ चमचे मका पीठ फेसून घ्या.पेस्ट तयार होईल.

मैदा चाळून घ्या,त्यात १ चमचा मीठ घाला,७५ग्राम तूप गरम करून घाला, लिंबाचा रस व कोमट पाणी घालून सैलसर भिजवा.या मैद्याचे ६ गोळे करा.एका गोळ्याची पोळी लाटा,त्यावर फेसलेली पेस्ट लावा व गुंडाळी करा.त्याचे ७,८ बारीक काप करा,(बाखरवडी सारखे) ते ट्विस्ट करा,व त्यातील ४,५ गोळे एकावर एक ठेवून लांबट पोळी लाटा,मध्ये कापा,कापलेल्या बाजूचा भाग अजून थोडा लाटा,त्याच्या दोन्ही अंत्यबिंदूना वर उचला,त्रिकोणी आकार देऊन बोटांच्या पोकळीत धरा,भाजी भरुन तोंड बंद करा, असे सर्व समोसे करा,कोरडे पडू नयेत म्हणून ओलसर फडके वरून घाला.(करंज्याना घालतो,तसे.)

मध्यम आचेवर तळा.

टीपा

हे समोसे इथे 'हीट' आहेत.तमाम जर्मनांचे बटाट्यावर फार प्रेम! आणि इथे उत्तरेतून आलेली मंडळी बरीच,ती ही,हॉटेल व्यवसायातील!त्यामुळे इथे समोसा लोकप्रिय व्हायला वेळ नाही लागला..पण ब.वडे आमच्या जर्मन मित्रमंडळीत लोकप्रिय करण्याचे श्रेय मी सविनय घेऊ इच्छिते..

माहितीचा स्रोत

सौ. अमृते बाई.

Post to Feedमस्त!
हिट
छानच!
मस्त !
ट्विस्ट

Typing help hide