झब्बू - १

यत्ता १ ली -


गणू, मधु, मिनी, पिंकी
नाज, सॅम, रामू, रिंकी

इयत्ता ३ री

मी मधुकर,गणेश मी,
मी मिनाक्षी , पिंकी मी
नाज मी, सॅम्युअल मी
मी रामन् अन् रिंकी मी


 


इयत्ता ५ वी अ,ब

मधुकर बर्वे माझे नाव,गणेश बर्गे नाव माझे 
मी मिनाक्षी शाह आणि मी हो पिंकी राजे
नाज खान माझे नाव, सॅम पिंटो नाव माझे
मी आहे रामन् अय्यर अन् ती रिंकी खन्ना लाजे


 


इयत्ता ८ वी अ,ब , क, ड

नाव - मधुकर बर्वे
पत्ता - रत्नागिरी
धर्म  - हिंदू


नाव - गणेश बर्गे
पत्ता - सातारा
धर्म  - बौद्ध

नाव - मिनाक्षी शाह
पत्ता - वडोदरा
धर्म  - हिंदू


नाव - नाज खान
पत्ता - कलकत्ता
धर्म - मुस्लीम

नाव - सॅम्युअल पिंटो
पत्ता - चेन्नई
धर्म - ख्रीश्चन

नाव - रामन् अय्यर
पत्ता - तिरुवनंतपुरम्
धर्म -  हिंदू


नाव - रिंकी खन्ना
पत्ता - चंदीगढ
धर्म - शीख


इयत्ता १० वी खास, अ ,ब , क, ड


रत्नागिरी, ब्राम्हण, हिंदू
सातारा, एन.टी., बौद्ध
वडोदरा, जैन, हिंदू
कलकत्ता, शिया, मुस्लीम
चेन्नई, प्रोटेस्टंट, ख्रीश्चन
तिरुवनंतपुरम्, अय्यर ब्राह्मिन, हिंदू
चंदीगढ,शीख


महाविद्यालय


रत्नागिरी, ब्राम्हण, हिंदू, मराठी, हिंदी, इंग्रजी
सातारा, एन.टी., बौद्ध, मराठी, हिंदी, इंग्रजी
वडोदरा, जैन, हिंदू, गुजराती,हिंदी,इंग्रजी,मराठी
कलकत्ता, शिया, मुस्लीम, उर्दू,हिंदी,इंग्रजी,मराठी
चेन्नई, प्रोटेस्टंट, ख्रीश्चन, इंग्रजी,हिंदी, फ्रेंच, मराठी
तिरुवनंतपुरम्, अय्यर ब्राह्मिन, हिंदू, तुळू, इंग्रजी, हिंदी,
चंदीगढ,शीख,पंजाबी,हिंदी,इंग्रजी,स्पॅनीश


.
.
.
शिक्षणक्षेत्राचा मांडलेला बाजार पाहून
हल्ली कविताही रूक्ष होत चाललीय
तुमच्या माझ्यासारख्यांबरोबर राहून
बिचारी स्वत्त्व हरवत चाललीय

म्हणे...


आता एक आनंदाची बातमी झळकणार आहे
कवितांनीदेखील आरक्षण लागू होणार आहे!