कठिण/कठीण कठिण किती!

शुद्धलेखनात अनेक शब्दांची दोन (किंवा त्याहून अधिक) रूपे प्रचलित असू शकतात. 



उदाहरणार्थ:




कठीण/कठिण
माहीत/माहित
परिघ/परीघ
दुढ्ढाचार्य/ढुड्डाचार्य
दुर्मीळ/दुर्मिळ
पूर्णिमा/पौर्णिमा
ह्या/या


 


अशी रूपे प्रचलित असणारे शब्द आढळल्यास इथे द्यावेत. ह्या शब्दांची यादी तयार केल्यास तिचा फायदा लेखकांना आणि शुद्धिचिकित्सकाला होऊ शकेल.


 



१. असे शब्द वापरताना एकच नियम: सातत्य. एखाद्या लेखात असा शब्द आल्यास त्याचे एकच रूप  सातत्याने वापरावे. एका वाक्यातला 'कठीण' त्याच लेखातल्या दुसऱ्या वाक्यात 'कठिण' होऊ नये.