लिफ़्ट मागणारे महाभाग !

अनेकदा आपण पहातो,गाडिवरुन जाताना रस्त्याच्या कडेला पण मोक्याच्या जागी अंगठा बाहेर काढुन लिफ़्ट मागणारे लोक उभे असतात...!!


अचानक,हे लोक कुठुन आले ? पुण्यात तरी ह्या आधि हि पिडा अस्तित्वात नव्हती...मुंबईय्या लोक प्रामुख्याने ह्या (भिकार)व्यवसायात अढळतात...त्यातच आता OMS ची वर्दळ वाढली आहे तेन्व्हा काय,रोगाचा प्रसार वेगाने होत आहे !


एखादेवेळी अगदिच emergency असेल तर समजुन घेऊ शकतो हो,तरिहि हे लोक लिफ़्ट मागतच फ़िरतात,आता असेही नाही कि ह्यांच्याकडे पैसे नसतात...


सिगरेटी ओढायला आणि movies बघायला पैसे असतात पण २KM जायचे असले तरि रिक्शा करत नहित, जसे काही लिफ़्ट मागणे हा हक्क आणि कुणितरि लिफ़्ट देणे हे कर्तव्य आहे !!!


काहितरी घाणेरड्या कल्पना समजात लगेच रुजतात...आणि त्यावर अंमल्बजावणी सुद्धा होते...आपण फ़क्त लिफ़्ट देतो/नाकारतो !!!


आणि station road,sancheti hospital,JM road वर तर सध्या ह्या प्रकारांन्ना उतच आलेला आहे... हे लोक सिग्नल वर थांबतात,आणि लाल सिग्नल ला गाडि थांबली कि मग,तिथेच विचरणा चालु करतात....


अहो पुढच्या सिग्नल ला सोडणार का ? कुठे जाताय ? जरा लिफ़्ट देणार का ?


मला एक सम्मजत नाही,ह्यांन्ना चालत जायला काय होत ? रिक्शा परवडत नसेल तर बस नी जा...... (असे खुप कमी लोक आहेत जे परवडत नाही म्हणुन लिफ़्ट मागतात......खरं तर असे लोक मुकाटपणे चालु पडतात,११ नंबर चा देखिल त्यांना अभिमान असतो)


पण खिशात पैसे असुन असा भिकारिपणा करणार्यांन्ना तर भर उन्हातुन अनवाणी २० KM चालायला लावले पाहीजे.....


 


 


आपले काय मत आहे? पुण्यात तशीही भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे...पण हे असले पैसेवाले भिकारी नष्ट करणे आपल्या हातात आहे....चला लीफ़्ट (चा महाऱोग)मुक्त पुणे करुया!


कोणिच कोणाला लिफ़्ट देउ नका. बघा १० दिवसात सरळ होतिल हे लोक....


(शुद्धलेखानाच्या चुका काढु नये,बर्याच दिवसाने KEY BOARD हाताळत आहे त्यामुळे,शुद्धलेखान येत असुन वेळेअभावी टाळले आहे ! बाकि भावना पोचल्या म्हणजे झालं काय.....! पुणेकर सुज्ञ आहेतच !!)


----


मीमराठी !