मनोगत कसे वाचावे?

प्रिय मनोगती सदस्य हो,

मनोगत वरील जुने/नवीन लेख शोधून वाचणे हे मला फार कष्टाचे होत आहे. मुखपृष्ठावर सगळे दिसेलच असे नाही, शिवाय ते बदलत राहते. कुठलीच RSS feed चालत नाही. "नवीन" आणि "अद्यावत" खुणा नेहमी बरोबर दिसत नाही. "शोधा" वापरूनही सगळे सापडेलच असेही नाही.

त्यातल्या त्यात वर्गवारीमध्ये जाऊन काहीतरी सापडते. पण बऱ्याच गोष्टी, चर्चा मला खूप उशीरा सापडतात. दररोज वर्गवारीच्या वाऱ्या करणे जमत नाही. मध्येच काही दिवस जर मनोगत वर आलो नाही तर मग विचारायलाच नको.

असे असताना बाकी मनोगतींना मात्र काही त्रास न होता ते मुक्त संचार करत आहेत असे दिसते. म्हणजे मी काही चुकीची पद्धत मनोगत वाचण्यासाठी वापरतो आहे का? मराठीत म्हणायचे तर "ऍम आय मिसिंग समथिंग?".

माझा हा प्रश्न सोडवा. मनोगती मनोगत कसे न्याहाळतात (browse करतात) ते मला सांगा.

धन्यवाद!

- केदार

ता.क. शीर्षक वाचून "याला मराठी वाचता येत नाही वाटतं" असा आपला (गैर)समज झाला असेल तर क्षमस्व! :-)