शब्दांच्या जाती आणि चालीरीती

आंतरजालाच्या माध्यमातून मराठी व्याकरणाच्या किमान माहितीच्या उपलब्धतेचा टप्पा पार पडल्या नंतर सर्वंकष मराठी शब्दकोशही महत्त्वाची निकड आहे.


विक्षनरी (दुवा) हा मराठी विकिपीडियाचा सहप्रकल्प आहे. यात प्रत्येक शब्दाचे अर्थ ,समान अर्थी शब्द विरुद्धार्थी शब्द, मराठी व्याकरणा नुसार त्या शब्दाचे कूळ , मूळ शब्द, जाती , सामान्यरूपे, त्यातील प्रत्य्ये,संधी समास,विग्रह,पारिभाषिक संज्ञांच्या व्याख्या, शब्दाचे वाक्यात उपयोग करून दाखवणे, समानार्थी परभाषेतील शब्दांच्या नोंदी, शब्दांचे वर्गीकरण, हे सर्वंकष स्वरूपात अंतर्भूत करणे अपेक्षीत आहे.


या सर्व गोष्टी विशिष्ट क्रमाने याव्यात या साठी सर्व पानावर एकसारख्या माहिती चौकटी तयार कराव्यात असा बेत आहे.


एकतर या माहिती चौकटीचे स्वरूप आणि काय काय माहिती असावी सोबतच मनोगतींना भावेल अशी काय रंजकता (शब्दकोडी ) वगैरे या प्रकल्पात समाविष्ट करावी या बद्दल सहमनोगतींची मते जाणून घेण्यास उत्सुक आहोत.


तसेच मोठ्या प्रमाणावर उत्साही मनोगतींनी यात सहभाग अपेक्षीत आहे.


आपला


-विकिकर