आव्हान -२

आमची प्रेरणा कुमार जावडेकर यांची सु रे ख गझल आव्हान


रोजचे झालेय मदिरापान माझे
प्यायल्या वर राहते ना भान माझे


बोल बोलू दे इथे त्यांना कितीही
चालले आहे खरोखर छान माझे


झिंगण्याचा मुक्त मी आस्वाद घेतो
विसरूनी सारे अता सन्मान माझे


मी किती  प्यायलो मला कळलेच नाही
उंच आकाशात गेले यान माझे


येवढे सांगा तुम्ही मला आता
ठेवले आहे कुठे मी वाहन माझे


काळजी का वाटते माझी मला?!
पोचणे स्वगृहि हेच आव्हान माझे


चांगले केलेच ना काव्य कधी मी
जाहले आहे विडंबन घाण माझे


 -(तर्र) अनिरुद्ध अभ्यंकर