नववर्ष २००७ आणि शुभेच्छा कशी द्याल? गर्व से कहो हम.... हैं।

नववर्ष २००७ आणि शुभेच्छा कशी द्याल? गर्व से कहो हम मराठी हैं।


मनोगती किंवा विकिकर असल्याचा अभिमान असलेल्या मराठी मित्र मैत्रिणींनो. नेमेची येतो पावसाळा या नेमाने आपण नववर्षाच्या शुभेच्छांची देवाण घेवाण करत असतो. यात एक प्रमुख नवीनतम माध्यम आहे मोबाईल एस.एम. एस आणि मेसेंजर.  


मोबाईल एस.एम. एस आणि मेसेंजर या दोन माध्यमांचे संदेश शक्य तेवढे त्रोटक असतात. मनोगत किंवा मराठी  विकिपीडिया ज्यांना आपला वाटतो त्यांना आवाहन आहे या वर्षीच्या या दोन माध्यमातील शुभेच्छा संदेशात एक त्रोटक वाक्य मनोगत किंवा मराठी विकिपीडिया बद्दल असेल.


तर या चर्चेत करा सुरवात वाक्य सुचवण्या करता अर्थात माध्यम आणि प्रसंगांना अनुलक्षून


नियम:



  • ध्येय उद्देश्य मराठी संकेतस्थळांची इतर मराठी भाषिकांना माहिती होणे आणि वापर होणे.
  • वाक्य कमीत कमी शब्दांचे असावे.
  • सोबत मनोगत किंवा मराठी विकिपीडियाचा दुवा असावा
  • प्रसंगाला आणि शुभेच्छा संदेशात सहज मिसळले पाहिजे.
  • संदेश प्रभावी पणे गेला पाहिजे, मराठी,रोमन, आणि चित्रांकीत आवृत्त्या पण दिल्यात तर स्वागत आहे.

चला विचारांना द्याच थोडी चालना , गर्वाने सांगा मी मराठी आहे!


आपल्या मनोगती प्रतिसादांची लौकरात लवकर वाट पाहतं आहे.


जय महाराष्ट्र!!!


-विकिकर