आंब्याच्या लोणच्याच्या खाराचे पराठे

  • अरधा वाटी लोणच्याचा खार,२ वाटी कणीक,१ डाव बेसन
  • १ छोटा चमचा तांदुळाची पिठी,१/२ वाटी तेलाचे मोहन
  • थोडे तिखट,थोडे मीठ,चवीला साखर.
१५ मिनिटे
२-३ जणांना पुरेल

वरील सर्व सामग्री  मिसळुन  घट्ट भिजवावे. त्रिकोणी आकाराचे पराठे लाटावे. तवा तापत ठेवावा. दोन्ही बाजुने तेल टाकुन खमंग भाजावा.

लोणचे,सरसो तेलाचे ,व त्यात    बडीशोप,भाजलेले जिरे,कलोंजी हे सर्व मसाल्यामुळे पराठा वेगळा , व चविष्ट लागतो.

आई