माणसे (गझल)-२

आमची प्रेरणा जयंतरावांची माणसे (गझल)

शरम लाज सगळी विसरती माणसे
बघत खेळ तसला गुंगती माणसे

तो तिथे नाचला, मी जरा झिंगलो
नाव माझेच का सांगती माणसे?

तीच ती टेबले,त्याच त्या बायका
बदलतो बार, ना बदलती माणसे

दूर असला तरी मी तिथे पोचलो
अन नकोतीच का भेटती माणसे

नाचती लोक हे सोडनी लाज का?
"केशवा"लाच ना समजली माणसे

(केशवसुमार 69)