काही चारोळ्या......

माझी आई सौ. मंजुश्री गोखले हिच्या काही चारोळ्या...

१. माता आणि माती

      वेलांटीचा फरक आहे..

दोघीनाही विसरलं तर

      सारं आयुष्य नरक आहे..

२. फुलांनीही कधी कधी

    काट्यांसरखं व्हावं

तेव्हाच टिकून राहतील..

   ही फुलपाखरांची गावं..

३. घडावं की बिघडावं,

   हे ज्याचं त्याचं कर्म...

मनं जोडत जाणे

    हाच माणसाचा धर्म......

४. देशहिताच्या गप्पा मारणे

       हा आमचा छंद आहे..

सभा, संप, मोर्चे

     यामुळे काम बंद आहे...

५.प्रेमात पडू नये

    यालाच शहाणपण म्हणतात..

आणि चुकून पडलोच तर

   शहाणं पण म्हणतात....

कवयित्री: सौ. मंजुश्री गोखले.

चारोळी संग्रह : १. फुलपाखरांचा गांव

                 २. आकृतीगंध