प्रेम कसे करावे.

प्रेम कसे करावे पण एखाद्या सुंदर तरूणीवर.सर्वच तरूण आणि तरूणी एका विशिष्ट वयात आल्यावर प्रेमात पडतात. त्यातील काही जण प्रियकर प्रेयसी होतात उरलेले एकतर्फी प्रेम करतच असतात. पण एकतर्फी प्रेमाला वयाचे बंधन नसते लग्न झाले असले तरिही माणसाला कोणिना कोणी आवडत असतेच. एकतर्फी प्रेम हे मुक असते . त्यातून ज्या घटना घडतात किंवा त्या प्रेमाचा जो उद्रेक होतो प्रेयसीला संपवण्यात तो चुकीचा आहे. तर आपला विषय पुर्णत:हा वेगळा आहे .एखाधा सुंदर तरूणीवर प्रेम कसे करावे. सुरवातीला माणूस जेव्हा प्रेम करायला लागतो तेव्हा ते एकतर्फीच असते. प्रेमाची व्याख्या कोणिही सांगू शकत नाही. ते कसेही होऊ शकते. असे असले तरिही मूळ प्रश्न राहतोच प्रेम कसे करावे. आपण जिच्यावर प्रेम करतो ती आपली होईल का कधीतरी असा आपण विचार करत असतो. पण ते प्रेम व्यक्त करायला नेहमी घाबरत असतो.  ती नाही म्हणाली तर  त्यामुळे विचारण्याच नेहमी आपण टाळत असतो. तरीही आपण प्रेम करत असतो. कधी कधी विचार करतो आयुष्य हे एकदाच मिळत असत त्या आयुष्यात तीचीही आपल्याला साथ हवी. पण आपण विसरत असतो तीलाही आयुष्य एकदाच मिळत असत. कधीतरी तिच्यासमोर आपले प्रेम आपण व्यक्त करतो होकार मिळाला तर पाच सहा दिवस हवेत उडत असतो नकार मिळाला पाच सहा दिवस दाढी वाढवून, मौन बाळगून मिळालेल्या नकाराचा निषेध व्यक्त करत असतो. तरिही आपण प्रेम करत असतोच . असे म्हणतात की विवाहाच्या गाठी आधीच बांधून ठेवलेल्या असतात हे  चुकीचे आहे कारण  दु:खी प्रेमविरांचे सांत्वन करण्यासाठी लिहीलेले हे वाक्य आहे. प्रेमी युगुलाला पाहून आपण मनातल्या मनात जळतो त्यातूनच मग कविता,चारोळ्या,गझल लिहू लागतो आणि  आपले प्रेम प्रकट करत असतो. मनातल्या मनात विचार करत असतो तिच्याशिवाय मी जगू शकत नाही मग ती कशी माझ्याविना जगते तेव्हा आपण विसरत असतो तिलाही आयुष्य आहे विचार आहे. कधी कधी जीव धावासा वाटतो तर का फक्त एका नकारामूळे .अश्या वेळी आपल्यावर जिव असलेल्या आई ,बापाचा,नातेवाईकांचाही आपल्याला विसर पडतो ह्यालाच का आपण प्रेमाची विलक्षण ताकद म्हणतो. म्हणूनच वाटते की प्रेम कसे करावे या प्रश्नाचे उत्तरे शेवटी अनुत्तरीतच राहतो.

आपला

कॉ.विकि