जेवणाचे नियम सारे मोडले मी

जेवणाचे (/वैद्यकाचे) नियम सारे मोडले मी
पोट जे रिचवीत गेले, जोडले मी!

मोडला काटा तसा मीही उडालो...
खानपानाला तरी ना सोडले मी...

राहिला आता कुठे संदर्भ त्यांचा?
लंघनांचे सर्व दावे खोडले मी!

कळत-नकळत मी कसा बोलून गेलो!
वजन लपलेले तिचेही फोडले मी...

बांधले समजावण्यासाठी मला ते...
वाढत्या मापात पट्टे तोडले मी?

- माफीचा साक्षीदार, मनोगत

कुमार जावडेकर ह्यांच्या नियम वर आधारित