रान आहे माजले शहरात या
रोज वणवे पेटले शहरात या...
शहर कसले हा तुरुंगच केवढा!
माणसांना डांबले शहरात या!...
चार भिंतींना घरे म्हणतात का?
माणसांविण बंगले शहरात या...
दाखवा मज एक व्यक्ती 'सज्जन'
कोण आहे थांबले शहरात या...
माणसे का धावती शहराकडे?
काय आहे ठेवले शहरात या?...