दोन चिमण्या भेदरलेल्या
वादळ वाऱ्याला घाबरलेल्या
थरथरणारं काळीज घेऊन
वळचणीला बसलेल्या
चिमणी म्हणाली चिमण्याला
कशी तोंड देऊ या तुफानाला
वाटते मज भीती आता
होणार काहीतरी जिवाला
चिमणा म्हणाला चिमणीला
भिऊ नको घाबरू नको
मी आहे ना
तुझ्या संगतीला सोबतीला
पुन्हा पंखांत बळ येईल
दुबळं का होईना
थोडसं उडता येईल
तुला मला लागेल इतका
चिमणचारा मला
नक्कीच आणता येईल
पुन्हा सांगतो दु:ख करू नको
जे तुझं नाही त्याकडे पाहू नको
मी तुझ्यासाठी आणि तू माझ्यासाठी
हे कधी विसरू नको