"आणि इथला शुद्धिचिकित्सकही वापरावा" या वरील मताशी मी सहमत आहे. हल्ली इथे "ऑटो करेक्ट" पद्धतीने जिथल्या तिथे शुद्धलेखन सुधारले जात आहे की काय असे वाटते आहे.
"संस्कृत ओळख" असे लिहिताना संस्क्रु या शब्दाला त जोडला तर लगेच "संस्कृत" शब्द तयार होतो. यातील रु र्ह्स्व (रु) वा दीर्घ (रू) कसाही टंकित केला तरी चालू शकतो असे दिसते आहे. तीच गोष्ट ओळख शब्दाची. बाळ्या, ओळ्या सारखे ओळ्ख असे लिहिणे कठीण आहे. ओल्ख सारखे ओळ्ख लिहायला गेलो तर ओळख आपोआप झाले.
तात्पर्य मनोगतावर अशुद्ध लिहिणे कठीण होत आहे. आणि शुद्धिचिकित्सक वापरून जवळ जवळ १००% निर्दोष लेखन शक्य आहे.