अनुस्वारयुक्त शब्दांच्या जागी .n, .M च्या ऐवजी वापरल्यास त्याचे अनुस्वारामध्ये आपोआप रुपांतर होते ही चांगली गोष्ट आहे. मात्र ह्याचा तोटा वेदान्त', सप्ताहान्त' वगैरे शब्द लिहिण्यामध्ये होतो. काही दिवसापूर्वी माझ्या लक्षात आले की सप्ताहांत आपोआप झाले, पं तोच शब्द अवतरणचिह्नामध्ये लिहिल्यावर मात्र स्वयंसुधारणा झाली नाही. आता मात्र अवतरणचिह्नांमध्ये लिहिले तरी न ला त जोडण्या ऐवजी त्याचा आपोआप अनुस्वार होतो आणि शब्दाचा अर्थ बदलतो. वरती हे शब्द न ला त जोडलेल्या स्वरूपामध्ये टंकता यावे म्हणून खटपट करावी लागली. ह्यासाठी काहीतरी करावे.