वेदान्त सप्ताहान्त असे लिहिण्यासाठी एक करावे.

१. नेहमीप्रमाणे लिहावे .... शब्द पूर्ण करून मोकळी जागा सोडली की त्याचे आपोआप वेदांत सप्ताहांत असे होईल.

२. नंतर पुन्हा मागे मागे येत (बॅक स्पेस वापरून) वेदांत -> वेदां -> वेदा असे होईपर्यंत खोडत जावे.

३. उरलेल्या शब्दापुढे दर्शक ठेवून टिचकी मारावी. आणि तेथे न्त असे लिहावे. ( न्त असेच (किंवा शब्दाच्या सुरवातीला) फक्त लिहिलेले असताना ते बदलत नाही.) म्हणजे ते वेदान्त असे होईल.

नेहमीच्या लिखाणात न्त असे शब्दाच्या सुरवातीला येण्याची शक्यता नसल्यामुळे विशेषप्रकारे 'न्त' लिहिण्यासाठी तसा प्रयोग करण्याची योजना आहे. अशा अनेक युक्त्या कराव्या लागणार आहेत. एकेक करून पाहू.