मुंबईच्या महापूराचीच आठवण होते. तेव्हाही उपनगरातील पाणी पुरवठा दोन-तीन दिवस बंद असल्याने आम्ही घराबाहेर अडकून पडलो होतो.

गोनू या नावाबद्दल काही माहिती आहे का? म्हणजे हे नाव का दिले, कोणी ठरवले? अमेरिकेत अशी वादळे दरवर्षी येतात आणि त्यांना दरवर्षी आलटून पालटून पुरूष आणि बायकांची नावे दिली जातात असे वाटते. (चू. भू. दे. घे) जसे, दोन वर्षांपूर्वीचे कत्रिना किंवा आम्ही गेल्यावर्षी अशाच एका सौम्य वादळात फ्लोरिडाला सापडलो होतो त्याचे नाव होते अल्बर्टो.

चित्रे आणि वर्णन आवडले हे वेगळे सांगायला नकोच.