खरंय तुमचं म्हणणं, दोन महिन्यांनी मला अमेरिकेत येऊन चार वर्षं पूर्णं होतील, आणि या वेळात जे अनुभव आलेत त्यावरून मी तुमच्या मताशी पुर्णपणे सहमत आहे. आपण भारतातून येवढे दूर आल्यावर सर्व गोष्टींची गोळाबेरीज केली तर बाकी शून्य राहते. पैसा, स्वातंत्र्य आणि आराम ह्या गोष्टींपेक्षा परदेशातलं प्रदुषणमुक्त वातावरण, काम करण्याची पद्धत, उपलब्ध असलेल्या सुविधा आणि केलेल्या कामाचं समाधान या गोष्टी आपल्याला या देशांशी बांधून ठेवतात. पण त्याचवेळी आपल्या माणसांपासून दूर नेतात. ज्यावेळी आपल्या माणसांना आपली गरज असते त्यावेळीसुद्धा आपण त्यांच्या जवळ राहू शकत नाही. त्यामुळे मी तर ठरवलंय अजून १-२ वर्षात भारतात कायमस्वरूपी परत जायचं. गेली १०-१२ वर्षं आई-बाबा पासून दूर राहतोय, त्या आधीच्या त्यांच्या आणि भावंडांबरोबरच्या आठवणी फक्त शिल्लक आहेत. माझ्या सारखे इतर भरपूर असतील, त्यांना परदेशात राहून भारतात परत जायची इच्छा होत नाही का? की उपलब्ध असलेल्या सुख-सुविधांपुढे आपल्या भावना बोथट होत चालल्या आहेत? आज भारतातही कितीतरी संधी उपलब्ध आहेत, मग आपण देशापासून, आपल्या लोकांपासून दूर राहून काय मिळवतो?
- अमोल