कथा आवडली असे लिहिणाऱ्या सर्वांचे अनेक आभार.
अनुपमा,
तुमच्या लिखाणाचा एक पंखा समुहच सुरु करायला हवा!
हाहा! अनेक धन्यवाद पण नको हो, तसे केल्यास उन्हाळा अधिकच तीव्र होईल.
प्राजु,
कथेचा शेवट तुम्ही सांगितला तसाही होईल आणि शोभेलही. दु:खांत, लुच्चेपणा इ. प्रकारेही करता येईल. सदर चेटकीणीची कथा अमेरिकेतील ब्लेअर विच प्रोजेक्टबद्दल वाचताना कधीतरी वाचनात आली होती. त्यात त्या स्त्रीचा मृत्यू अशाप्रकारे होतो त्यामुळे तो भाग तसाच ठेवला.
सखि,
भयकथा तुला छान जमतात हे या कथेने परत सिद्ध केले असे म्हणावेसे वाटते.
असा गैरसमज माझाही आहे. तशी ही भयकथा नाही, म्हणजे रानात म्हातारीशी भेट झाल्यावर म्हातारी तिला भीती घालण्याचा कोणताही प्रयत्न कळत/नकळत करत नाही. उलट, जी स्त्री इतकी घाबरली आहे तिला आणखी भिववण्याचा म्हातारीचा प्रयत्न नाही. अर्थात, वातावरणनिर्मितीतून जितकी भीती निर्माण होऊ शकेल तितकी ठेवली आहे इतकीच. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पेठकर,
कथा कल्पना ओळखिची असली तरी ती शब्दात मांडण्याचे कसब कौतुकास्पद आहे. प्रयत्न केल्यास नविन कल्पना नव्या कथेच्या रुपात साकार होऊ शकेल.
यावेळेस कथा कल्पना ओळखीचीच ठेवायची होती, काळही थोडा जुना ठेवायचा होता. (गेल्या कथेत चालू काळ दाखवला होता.) कथेची मांडणीही सरळसोट ठेवायची होती, कोणताही धक्का न देताही कथा बांधून ठेवते का इ. कथा बंदिस्त कशी राहिल, प्रवाही होऊन वाचकाच्या मनात (काळाबद्दल, गावांतील अंतराबद्दल, आख्यायिकेबद्दल आणि इतर) शंका निर्माण करणार नाही हे पाहायचे होते, हा प्रयत्न बऱ्याप्रमाणात यशस्वी आहे असे वाटते.
को अहम,
तुमच्या एका शंकेचे उत्तर वर आहेच.
गंगाक्का तरुणपणी मेली, मग राधेला म्हातारी गंगाक्का का दिसावी?
"इच्छेला" बंदिस्त चौकट असते का?
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.