- नसे हा कधी चारचौघांप्रमाणे ।
जगी मानिती त्याजला ह्याप्रमाणे ? ॥ (४) हनुमान, शक्तिमान, (~सुपरमॅन)!? - थोडा राग आला तरी ठार करू (२) = मारू
- असल्यांमध्ये ताकभात म्हणणे म्हणजे गोंगाटच (४) = अशांतता
- टपाल चिरु कुस्करु तेच तेच चावून कंटाळा आला तर हे करणारच (५) = रुचीपालट
- मालक झोपतील आंतमध्ये (२) = पती
- साका जमेस धरू नकोस (२) = गाळ
- विनोद आवडलेली आनंदी (५) = हसतमुख
- असे पक्के ठरवायचे आणि गडबडून म्हणायचे मारा कर ना (५) = करारनामा
- बाहेर नसणारे बंगाली अन्न पचविण्याचा एक अवयव (३) = आतडे
- गावा जा गोंधळ घाल शेवटी आटप निवडणुकीसाठी हे करच (५) = जागावाटप
- पोलीस कार्यालय की प्रेते फाडण्याची जागा? (५) = फरासखाना
- वर्गवारीकडे (२) = प्रती
- लेखणी सोडून दे (२) = टाक
- माणसाच्या जीवनात माश्याचा जीवनक्रम कसा कळणार? (२,२,२,२,२) = जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
- प्रमाणापेक्षा जास्त अभावाने तो मुलाच्या मुलीला शेजारी बसवे (४) = अतोनात
- अस्वच्छ वस्त्या स्वच्छ करण्यात रस घेणारा एक प्राणी (३) = डुक्कर
- दुःखी अंतःकरणाने जन्माला घालण्यात केस रंगवणे (५) = विकलपणे
- शेवटचे अक्षर लिहिण्याआधीच निर्धार झाला तर काही कमी पडायला नको (३) = चंगळ
- मुख्य विषयाआधीचे ओळखपर भाषण अगर लेखन (४) = प्रास्ताविक
- होकारात्मक मान हाललेली दिसली की ही मिळाली समजावे (३) = संमती
- चंद्रवनातून वाहणारा पदार्थ (२) = द्रव
- जरा गोंधळाया प्रती भार सार ।
नि आकाशवाणी परी हो प्रकार ॥ (३,३) = प्रसारभारती - ओठात पकड (२) = धर
|
- जितके हवे तेव्हढेच दूध मोजताना इथे असते (३) = मापात
- बोरू पकडण्यातला एक अलंकार (३) = रूपक
- इतके संतापणे भिकेला लावते म्हणतात (२,२) = अति राग
- पायथ्याशी ठोकलेले तंबू (२) = तळ
- बगलेत खुपसला तर पाराच चढेल (५) = तापमापक
- बाजारात मिळणारे एक पेय (२,३) = रूह आफजा
- गावात रमणारी शीतलता (३) = गारवा
- हे आले की सोळावे सरले म्हणून समजावे (४) = सतरावे
- इतक्या लाजर्या की देशीच (४) = मुलखाच्या
- आकाशाला शिडी लावली तर संपत्तीचे भांडार गवसेल (३) = खजिना
- पुष्कळ सराव करून लोकांपुढे सोंग आणणे (३,३) = नाटक करणे
- पत्त्यांच्या डावातील सर्व एक्के राजे राण्या गुलाम दश्श्या नश्श्या अठ्ठया छक्क्या पंज्या चव्व्या तिर्या दुर्या शिल्लक ठेवल्या तर त्या डावाचा हा होईल (४) = सत्यानाश
- नगरसेवकांना जमला हो कारभार जर का
कशास मोठा गोंधळ सावरण्या तो येइ फुका? (४) = प्रशासक - एकवचन द्विवचन बहुवचन असा निसर्गक्रम (५) = वंशविस्तार
- वडिलांच्या हातात पेन मुलाच्या हातात बॅट (५) = तेंडुलकर
- निम्मा उपग्रह काढून टाकण्यासाठी हा देतात (४) = अर्धचंद्र
- त्याप्रमाणे उलटलेला आकडा (२) = तसा
- अर्धवट मल्लाला बाण लागला तर तो काठ गाठील (४) = पैलतीर
- तिला जाण्याचा आग्रह करणारा निद्रानाश (२) = जाग
- पतीस कुंकू लावून घोळात घेऊन मान्यता मिळवावी (३) = पसंती
- नाट्यसमीक्षकाच्या नांवातील (चंद्र?) प्रकाश (२) = विभा
- मधला मधला गोड पदार्थ (२) = मध
|