बाहेर कोणाला 'थँक्यू' च्या ऐवेजी 'धन्यवाद' म्हणून बघा. ... हा शब्द येथे रूढ झाला आहे ... आपल्या लिहिण्याबोलण्यामध्ये असे शब्द आपण वापरतो का?
केवळ सवयीचा प्रश्न आहे. धन्यवाद म्हणायचे असे एकदा ठरवल्यावर मला त्याची (अती) सवय झाल्याने येथील इंग्रज, फ्रेंच वगैरे लोकांनाही मी गडबडीत धन्यवाद म्हणते. मग पुन्हा थँक यू. पण त्यांना समजते की ही आधीची भारतीय भाषा होती.
दुसरी मजेची गोष्ट म्हणजे इंग्लंडातील सुरुवातीच्या काळात मी इंग्रजीत पुष्कळ मराठी शब्द (इंग्रजी येत नसल्याने, अभावितपणे) वापरत असे. इंग्रजी नव्याने शिकणाऱ्या माझ्या चिनी, फ्रेंच-अरबी मैत्रीणी ते शब्द थेट उचलत असत. त्यांना हे इंग्रजी नाही असे सांगूनही. त्यामुळे आता, "आय वॉज़ इन सच 'बाप्रे' सिचुएशन, यू नो." असली वाक्ये त्या आरामात म्हणतात. आम्ही मुली भाजी, रस्सा, आमटी असल्या नावांची भाषांतरे न करता थेट तशीच वापरतो. तसेच त्या इतर संस्कृतीतल्या, भाषेतल्या पदार्थांनाही भाषांतरित करत नाही. आपण मराठी शब्दाऐवजी इंग्रजीत हिंदी शब्द वापरू पहातो, उदा. लाटण्याला बेलन, फोडणीला तडका वगैरे, ते मराठीच वापरले तर काय वाईट?
असो, मूळ चर्चा विषयातून फार दूर न जाता, असे म्हणते, की शब्दांना मराठी (संस्कृत नव्हे) पर्याय पहावेत, परभाषी शब्द मराठीकरण करून वापरावे व हिंदी शब्द वापरण्याचा मोह टाळावा, म्हणजे फारसे लफडे होणार नाही. :-)