वा! सन्जोपराव... या चर्चेमुळे आपल्या प्रतिभेला चांगलीच धार चढली आहे.
अगोदर लेखवजा प्रतिसाद, मग उपहासात्मक 'अनुभव' कथन आणि आता त्या सर्वांवर कळस म्हणजे ही कविता!
'अर्वाचीन मराठी भाषा : एक प्रश्नचिह्न' असे चर्चासत्र एखाद्या 'जागतिक' मराठी साहित्य संमेलनात झाले
तर आपले या विषयावरील चिंतन, मनन आणि लेखन हे एक मैलाचा दगड म्हणून ओळखले जाईल यात शंका नाही.
ता.क. : वरील प्रतिसाद म्हणजे वक्रोक्ती नाही याची कृपया नोंद घ्यावी.