आपण खूप वेळा बदल म्हणून बाहेर ख़ातो.पण त्याने आपल्याला खरोखर किती आनंद मिळतो?

मला स्वत:ला सांगायचे झाले तर अगणित, अपरिमित वगैरे गणिती संज्ञा वापराव्या लागतील. :)

१)हॉटेलमध्ये दक्शिण भारतीय किन्वा उत्तर भारतीय जेवण मिळते.पण महाराष्ट्रीय मिळत नाही.का?

महाराष्ट्रीयनही मिळते. अगदी सिंहगडाच्या माथ्यावर मस्त झुणका-भाकर, वाडग्यातले दही असा फर्मास बेत असतो. याशिवाय पुण्यात तरी साबुदाण्यच्या खिचडीपासून थालिपीटापर्यंत सर्व काही मिळते. अधिक माहितीसाठी इथे पहा

http://www.manogat.com/node/5550?comments_per_page=50&comments_per_page=50

२)पुलाव कच्चा असतो. ३)नान किन्वा रोटी वातड असतात ४) डाळ तिखट व कच्ची असते. ५)भाज्या तिखट व कच्च्या असतात.

६) दक्शिण भारतीय जेवणात सार वगैरे आंबट असतात.

आपण हाटेलं नीट निवडलेली नाही असा याचा अर्थ आहे. वर दुव्यामध्ये बऱ्याच चांगल्या जागा आहेत, तिथे जाउन पहावे.

बाकी कुठलही चांगला पदार्थ खाताना हा कुठल्या देशाचा, कुठल्या प्रांतातला असे विचार मनात येऊ नयेत. परदेशात आल्यावर मला याची तीव्रता जास्त जाणवली. घरी ज्या भाज्या शिजवूनही खात नव्हतो त्या इथे कच्च्या खाव्या लागतात. मग भारतात आल्यावर वडापावपासून उत्तप्यापर्यंत सर्व पदार्थ खाताना ब्रह्म भेटते. 

अवांतर : आपली गुळाची समस्या सुटली का? इथे हेराफेरीमधल्या परेश रावलचा संवाद आठवला, "देखो, तुमने फिर समस्या बदल डाली. पहले ये नक्की करो की तुम्हारा समस्या क्या है?" :)