अशा कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जाता आपण? ते बदलून पाहा.

तसेही, उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य पदार्थ इतके बेचव असते तर हॉटेलं चालली नसती. असो.

आता काही उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्यांची मराठी पदार्थांबद्दल मते वाचा.

१. मराठी लोकांना बासमती तांदूळ माहित नाही. लग्नात मसालेभात म्हणून कोलम तांदळाचा गच्च गोळा खाऊ घालतात.

२. मराठी लोकांच्या जीभेची दौड वडा-पावपर्यंत.

३. सुक्कड थालीपीठ, खडखडीत साबुदाणा खिचडी, तेलावर परतलेल्या भाज्या हे यांचे खाणे.

४. वरण भाताला आहाहा! म्हणणारे हे लोक, उकडलेली डाळ कशी खातात असा आम्हाला प्रश्न पडतो.

कॉलेज, कार्यालय यांतील अनेक अमराठी भाषकांकडून ऐकलेली ही मुक्ताफळे आहेत. दुसऱ्यांच्या अन्नाला नावे ठेवण्याचे उद्योग सर्वांनाच आवडतात असे वाटते.