मला पनीर पाहिले तरी पोटात ढवळून येते. त्यामुळे पनीर व बटाटा यांचा मुक्त वापर करुन बनवलेले पुण्यातील उपाहारगृहांतील उ.भा. पदार्थ अजिबात आवडत नाहीत.

त्यामानाने दक्षिण भारतीय पदार्थ उदा. इडली, डोसा, वडा, उत्तप्पा, बिसी बेळे भात, सांबार, रसम हे खायला अधिक "सोपे" वाटतात व जास्त बिघडलेले नसतात. :)

महाराष्ट्रीय पदार्थ मिसळ व वडापाव पुण्यातही मथुरा वगळता इतरत्र फारसे पहावयास मिळाले नाहीत.

पुरणपोळी, नारळीभात, दडपे पोहे, कांदेपोहे, थालीपीठ, करंजी, अनारसे, उकडीचे मोदक, वालाचे बिरडे, नागपुरी वडाभात, मासवड्या (शाकाहारी पदार्थ), हुलग्याच्या पिठाच्या शेंगोळ्या, भरलेली वांगी वगैरे पदार्थांचे जोरदार मार्केटिंग होत नाही असे वाटते.

मालवणी, कोल्हापुरी, सावजी मांसाहारी पदार्थांबद्दल तर जितके लिहावे तितके थोडेच. पण चिकन मराठा/चिकन कोल्हापुरी या नावाने पुण्यात दिले जाणारे पदार्थ हे जास्त तेल व मिरची घालून बनवलेले पंजाबी चवीचेच असतात.



कृपया पुरणपोळी कर्नाटकची की महाराष्ट्राची असा वाद काढू नये!!!


या प्रतिसादासाठी दुसरी चळवळ या ब्लॉगचा आधार घेतला आहे.