'पंतप्रधान' हा शब्द माझ्या आठवणीप्रमाणे शिवाजीच्या अष्टप्रधानमंडळापासून उपयोगात आहे. 'मेयर'मध्ये सुद्धा प्रथम नागरिक असा अर्थ कुठे होतो? आणि मराठी शब्द इंग्रजीचे शब्दशः भाषांतर का असावे? मराठी संस्कृतीला साजेसा गोळाबेरीज अर्थ दाखवणारा शब्द असावा इतकीच अपेक्षा असावी.
आचार्य अत्र्यांनी नगरपिता या शब्दावर तोंडसुख घेतले होते. एकाच नागरिकाला एवढे बाप कशाला पाहिजेत? तेव्हा नगरसेवक शब्दाचा जन्म झाला. दोन्ही शब्द म्यूनिसिपल काउंन्सिलर शब्दाची भाषांतरे नाहीत. इंग्रजीमधे नगरसेवकांना सिटीफादर्स म्हणतात. कोतवाल आणि नगरपाल हे असेच शब्द- इंग्रजीचे शब्दशः भाषांतर नसलेले.