प्रत्येक रंगलेली(?) चर्चा मला असेच वाटायला लावते.  आपण हे वाटणे छान शब्दबद्ध केले आहे.

अनुभव, वाचन, सहकारी मित्रपरिवार अशी अनेक कारणे अगदी साध्या साध्या आवडीनिवडीत बदल करून आणायला समर्थ असतात. 

माणसाच्या विचारसरणीवर संस्कारांचा पगडा असतो. हे सगळे या संस्कारांचे उगम आहेत. या संस्कारांचीही चांगले/वाईट अशी स्पष्ट विभागणी करता येणार नाही. तोल सांभाळणे, म्हणजेच तिसऱ्या मितीचा विचार करणे, नेहमीच आवश्यक आहे. प्रत्येकाने याची सवय स्वतःला लावून घेणे महत्त्वाचे. अर्थात या सवयीलाही ही मिती लागू पडतेच.  

- सीमा