हुतात्मा हा प्रतिशब्द आहे हे मज ठाऊक नव्हते किंबहुना हा शब्द आपला हा परका ही जाणीव त्याकाळी नव्हती. क्रांतिकारकांच्या कथा ऐकून/वाचून या शब्दाबद्दल एक सुप्त आकर्षण निर्माण झालेले. सर्वसाक्षी यांच्या लेखांतून तो शब्द सावरकरांनी मराठीला अर्पण केल्याचे कळले. केवळ राजकीय, शासकीयच नाही तर इतर कुठल्याही प्रकारचे परावलंबित्व, अगदी भाषिक सुद्धा, झुगारून देण्यास सावरकर किती समर्पित होते ते कळून सावरकरांबद्दलचा आदर अधिक वाढला.
तर, हुतात्मा हा माझा आवडता प्रतिशब्द. विषयांतराबद्दल क्षमस्व.