आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर रिलॅक्स उपहारगृह आहे तिथे पंजाबी,पिझ्झा,पावभाजी याबरोबरच सुंदर पातळ ज्वारीबाजरीच्या भाकऱ्या वर तूप व मिरचीचा खरडा टाकून गरम मिळतात. तिथली वालाची उसळ आणि वांग्याची भाजी या भाज्या घरी न खाणारे लोकही तिथे चवीने खातात.
पंजाबी, दाक्षिणात्य आणि मराठी, परदेशी. कोणतेही खाणे असो, ते चांगले बनण्याचा लौकीक असलेल्या ठिकाणी जाऊन खा, सर्वच आवडेल.
पंजाबी खाणे आठवड्यातून /दोन आठवड्यातून एकदा खायला चांगले वाटते. पण रोजच्या खाण्यासाठी वरण भात भाजी भाकरी पोळी याना पर्याय नाही असे मला वाटते.