अकॅडमीसाठी प्रबोधिनी हा फारच चांगला आणि सध्या रूढ झालेला शब्द आहे.  प्रबोधिका हा क्रमिक पुस्तकाच्या गाइडसाठी योग्य आहे.  किंवा समुपदेशन(Counselling) करणाऱ्या समुपदेशिकेसाठी.  अकादमी हा मुद्दाम केलेला अपभ्रंश असला तरी  सहज समजणारा, सोप्या उच्चाराचा आणि हिंदीत सर्रास वापरला जाणारा शब्द असल्याने मराठीने त्याचापण स्वीकार करायला हरकत नाही.  एका इंग्रजी शब्दाला एकापेक्षा अधिक प्रतिशब्द असले तर काही बिघडत नाही. हल्ली शाळेला प्रबोधिनी म्हणतात, त्यामुळे स्पष्टीकरणासाठी  जास्तीचा शब्द असणे आवश्यक झाले आहे.