वा कुशाग्र! सुरेख प्रकटन.

इंग्रजीतील सुंदर शब्दांवाचून लिहिणारे संकुचित, जळमटलेले लेखक, कवी वगैरे फारच बापुडवाणे भासत आहेत. काय ते पकाऊ रटाळ भिक्कार श्यामची आई. भाषा आणि विचार दोन्ही तद्दन कालबाह्य. आणि त्या माडगुळकरांच्या वा कुसुमाग्रजांच्या केविलवाण्या कवीता. उगाच तेच ते कर्मकठीण असे जडजंबाल शब्द एकाला एक जुळवलेले, अशाने नव्या पिढीला किती वाइट वाटेल हा विचार सुद्धा त्या स्वार्थी लोकांनी केला नाही. किंबहुना त्यांना बिचाऱ्यांना कल्पना नसावी की भावी पिढीला आपल्यामुळे मान खाली घालावी लागणार आहे.