ह्याला 'अगोदरच संगनमताने ठरवलेला निकाल' असे म्हटले तर मला वाटते ते एकदम सोपे व कुणालाही सहज समजण्यासारखे होईल. पण त्यात हिंदी बाज कुठे नसेल. तिथे मला वाटते आपल्या काही वर्तमानपत्रांना काहीतरी चुकल्यासारखे वाटते! मला आठवते, १९८४ साली ऑपरेशन ब्लू स्टारनंतर आर्मीच्या काही जवांनानी मुंबई व पुण्याच्या मध्ये एक आर्मीची ट्रकच पळवून नेली होती. त्यांना 'सर्वाधिक खपाच्या मराठी दैनिकाला' 'भगोडे' असे म्हणावेसे वाटले! मराठीमध्ये 'पळपुटे' असा शब्द आहे, ह्याचा त्यांना विसर पडला. आतातर हे असे हिंदाळलेले लिहिणे राजरोसणे चालू आहे!