मराठीचे निःसीम चाहते असलेल्या माझ्या सारख्या मंडळींनाही अत्रे 'ष्टाइल' मध्ये लावलेला हा "पंच" आवडला !
पण एक कळले नाही की ओढून ताणून विनोद करण्यासाठी इतके मराठी वळवून का बोलावे लागते ?
अगदी तुम्ही घरातले आपापसातले "डायलॉग्स" लिहिले असते तरी आपोआपच विनोद निर्मिती झाली असती......
"पप्पा हँडस फ्री मोडवर आहेत" असे भ्रमणध्वनीच्या हस्तसंचाबद्दल (फक्त 'आहेत' हा एकुलता एक मराठी शब्द सोडल्यास ) बोलणारी व अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली नवश्रीमंत मराठी मंडळी पुण्या मुंबईत कमी नाहीत !
ह्यातही विनोद निर्मिती होतेच ना !