दुराग्रहावर झणझणीत अंजन घालणारा आपला प्रतिसाद अत्यंत योग्य आहे !
सन्जोप रावांना मराठी प्रतिशब्दांबद्दल आपुलकी असणे/नसणे, त्यांनी स्वतःच्या वापरात कुठल्या शब्दांचे उपयोग नियमित करणे हा त्यांचा व्यक्तिगत भाग आहे......
पण म्हणून इतरांच्या प्रयत्नांची खिल्ली/टवाळकी उडवून स्वतःकडे असलेली प्रतिभा ह्या कारणांसाठी व्यर्थ घालवणे हे नक्कीच प्रगल्भतेचे लक्षण समजले जाणार नाही.
त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या काही मंडळींकडेही मी आजवर सन्मानाने बघत होतो......
चला, ह्या निमित्ताने व्यक्तींच्या विचारांशी प्रत्यक्ष ओळख होत आहे, हे ही नसे थोडके !