प्यांटीस तुमानी शर्टास म्हणुया सद्रे
हे अपुले बर्का, जरी हे वेडेविद्रे
तर्कावर करुया दुराग्रहाने मात
चल गड्या चेतवू या भाषेची वात
मस्त!! येऊ द्या अजून अशा टिंगलटवाळ्या.
तुमच्या टिंगलटवाळीमुळे मराठी भाषा मरणार नाही. पण त्यामुळे जर तथाकथित 'भाषाशुद्धीवाले' किंवा 'मराठीप्रेमी', 'पत्रीशब्दवाले' लोक हिरमुसून, रुसून शेवटी चिडणार असतील तर अशा लोकांनी मराठीची सेवा न करणे मायमराठीच्या हिताचे आहे, असे मला वाटते. खेळकरपणा शिकवता येत नाही हे खरे.