बऱ्याच अंशी रोहिणीताईंनी सांगितल्याप्रमाणे वापरत आहे.

मात्र तो पेन, तो/ती ईमेल असे वापरतो.

पेन हे शस्त्रापेक्षा जास्त बलवान असल्यामुळे आम्ही त्याला पुल्लिंगी संबोधन देतो.  

-(नवीन पुणेकर) योगेश

असो.

आम्हाला एक कोल्हापूरमधील गडहिंग्लजचे शिक्षक होते शाळेत असताना बरीच वर्षं. ते "खुर्ची घेतलास काय रे बसायला?" "चपाती आणलास काय रे डब्यात?" "डांबावरचा ट्यूबलाईट लावलास काय रे?" "घंटी झाला काय रे?" असे म्हणायचे. आणि तेच योग्य वाटायचे.

त्यामुळे लिंगवचनातील असे फरक जितके अस्सल पुणेकरांना जाणवतात/खटकतात तितके मला तरी जाणवत नाहीत. (लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते.)