ट्रॅफीक हा शब्द देखील मी वेगवेगळ्या लोकांकडून तो , ती आणि ते या प्रत्ययां सकट ऐकला आहे. मी ते ट्रॅफीक म्हणते. light या शब्दा बाबत सुद्धा असाच घोळ आहे. "वीज गेली" या अर्थी light गेले म्हणायचे की light गेली ???
माझी एक मैत्रिण light गेला म्हणते.
तसेच "तो ब्लाऊज" की "ते ब्लाऊज" ??? काही जण "मी ब्लाऊज शिवायला दिलं" असं म्हणतात.
मला असे वाटते की एकवचनी असल्यास "तो ब्लाऊज" आणि अनेकवचनी असल्यास "ते ब्लाऊज".