- या इंग्रजी शब्दांचा स्वीकार मराठीने केला आहे असे तुम्हाला वाटते का? नाही.
- इंग्रजी शब्दांचा स्वीकार करायचा नाही तर मग संस्कृत, हिंदी, फारशी, उर्दू, अथवा दक्षिणेकडील राज्यातून आलेले शब्द का स्वीकारायचे याला मुद्देसूद कारणे काय देता येतील? काहीही कारणे नाहीत. केवळ या बाकीच्या भाषा मराठीच्या जवळच्या आहेत, हे कारण असू शकत नाही किंवा भाषांची जननी हेही कारण लागू होते असे मला वाटत नाही.
- सुमारे ऐंशी हजार शब्द असणाऱ्या या मराठी शब्दकोशाला तरी प्रमाण मानायचे की नाही ? प्रामाण्य? हेही सापेक्ष असते ना? जाताजाता : केवळ `ए' या पहिल्या इंग्रजी वर्णावरून इतके इंग्रजी शब्द (ज्यात अनेकांना मराठी शब्द आहेत) येत असतील तर नाहीच.
- इतर शब्दकोशात परभाषेतले शब्द मराठी शब्द म्हणून आहेत का?असतील तर प्रमाण काय आहे? शब्दकोशाचे नाव सांगितले तर अधिक चांगले. फारसा अनुभव नाही.
- जेवढे शब्द संस्कृत वा इतर भाषातले आहेत तेवढेच शब्द मराठी प्रतिशब्द असतांना इंग्रजीतून मराठीत आले असे शब्दकोशावरून वाटते. इंग्रज गेले तरी त्या काळातील विद्वानांवर इंग्रजांचा जबरदस्त पगडा कायम होता म्हणून असे घडले की इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाला शरण जाऊन त्यांनी दूरदृष्टीने असे शब्द मराठी कोशात घेतले? नेमका प्रकाश तज्ञांनीच टाकावा.