- या इंग्रजी शब्दांचा स्वीकार मराठीने केला आहे असे तुम्हाला वाटते का?
सर्वच शब्द मराठीने स्वीकारले असे म्हणता येत नाही .पण 'ऍडवान्स'सारखे शब्द भाषाशुद्धीवाल्यांना कितीही नाके मुरडली तरीही अशिक्षित माणसेही अगदी सहजपणे वापरतात. त्यामुळे ते मराठी झाले आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे.
- इंग्रजी
शब्दांचा स्वीकार करायचा नाही तर मग संस्कृत, हिंदी, फारशी, उर्दू, अथवा
दक्षिणेकडील राज्यातून आलेले शब्द का स्वीकारायचे याला मुद्देसूद कारणे
काय देता येतील?
इंग्रजी शब्दांचा स्वीकार करायचा नाही असे कोणा विद्वानाने म्हटले आहे? कुठल्या शब्दांचा स्वीकार करायचा किंवा करायचा नाही, ह्याचा फैसला ती भाषा बोलणारी सर्वसामान्य जनता करीत असते.
- सुमारे ऐंशी हजार शब्द असणाऱ्या या मराठी शब्दकोशाला तरी प्रमाण मानायचे की नाही ?
नक्कीच. पण ऑक्सफर्डच्या शब्दकोशांसारखे मराठीतील शब्दकोशांचे लवकर उर्ध्वश्रेणीकरण ( मला नावडलेला अपग्रेडेशनसाठी वापरण्यात येणारा 'पत्रीशब्द') होत नाही. अनेक शब्दांची अर्थछटा कालांतराने बदलते. अनेक नवे शब्द भाषेत येतात. ह्या आणि इतर बदलांची शब्दकोशांत लवकरात लवकर नोंद व्हायला हवी. नाही झाली तरी काही फरक पडत नाही म्हणा. सर्वसामान्यांना त्यामुळे काही फरक पडत नाही. ते नेहमीच शब्दकोशाच्या पुढेच असतात.
- इतर शब्दकोशात परभाषेतले शब्द मराठी शब्द म्हणून आहेत का?असतील तर प्रमाण काय आहे? शब्दकोशाचे नाव सांगितले तर अधिक चांगले.
शब्दकोशात तशा नोंदी असतात. शब्दकोश कसा वाचावा, हे प्रत्येक शब्दकोशाच्या सुरवातीस दिले असते. किंवा तशी अपेक्षा तरी असते.
- जेवढे
शब्द संस्कृत वा इतर भाषातले आहेत तेवढेच शब्द मराठी प्रतिशब्द असतांना
इंग्रजीतून मराठीत आले असे शब्दकोशावरून वाटते. इंग्रज गेले तरी त्या
काळातील विद्वानांवर इंग्रजांचा जबरदस्त पगडा कायम होता म्हणून असे घडले
की इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाला शरण जाऊन त्यांनी दूरदृष्टीने असे शब्द
मराठी कोशात घेतले?
जाणकारांना विचारावे लागेल.