'ऍडवान्स'सारखे शब्द भाषाशुद्धीवाल्यांना कितीही नाके मुरडली तरीही  अशिक्षित माणसेही अगदी सहजपणे वापरतात. त्यामुळे ते मराठी झाले आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे.

या मताशी सहमत. पण इथं `ऍडवान्स'ची एकच अर्थछटा व्यक्त होत असावी. `बिलाचा ऍडवान्स' यातील (संदर्भ: साखर कारखाने). `ट्रूप्स ऍडवान्स्ड टू...' यातील ऍडवान्ससाठी (एक उदाहरण म्हणून) आगेकूच! आणि तोही वापरला जातो. `ऍडवान्समेंट'ची काय? प्रगती!

याअर्थी `ऍडवान्स' पूर्ण स्वीकारला आहे असं नाही, असं मला वाटतं. तुमचं मत?