आजच लोकसत्तामधील अग्रलेखात ( ०१.०४.०५) काश्मिर मधील प्रस्तावित बस यात्रेची माहिती वाचली. उशीरा का होईना, भारत - पाकिस्तान मधील मैत्री योग्य दिशेने जात आहे असे वाटते.
आता आपल्या देशातील मुत्सद्दी लोकांची खरी परीक्षा आहे. दहशतवादी आणि दोन्ही काश्मिरातील जनता यांना वेगळे पाडले पाहिजे. त्याच बरोबर पाकिस्तान व्याप्त काश्मिरीलोकांना काश्मिरमध्ये येवुन शिक्षणाच्या संधी दिल्या पाहिजे. ( ही दिर्घ काळीन योजना असेल). त्याच बरोबर व्यापार, पर्यटन इत्यादी गोष्टींना चालना दिली तर काही दशके न सुटलेला प्रश्नही सूटु शकतो हे सर्व लोकांच्या मनात येईल.
बघु या काळाच्या उदरात काय दडलेले आहे.