लेखकु महाशयांनी म्हटल्याप्रमाणे ह्या कवितेवरून असा ग्रह नक्कीच होतो की तुम्ही मराठी(जास्तीत जास्त शुद्ध... हा शब्द महत्त्वाचा)भाषा बोलावी/लिहावी असे म्हणणाऱ्या लोकांची टर उडवण्यासाठीच ही कविता रचलेय.आपली एरवीची भुमिका इथल्या सगळ्यांना माहितच आहे. त्याबद्दल आदरही आहे पण ह्या एकाच विषयावर आपण असे वारंवार लिहायला लागलात की असे वाटायला लागते की आपणही 'दुराग्रही' होत चालला आहात की काय? एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून आपल्या मताचा  आदरच केला पाहिजे;पण त्याच वेळी इतरांची मतेही आदरयुक्त स्वीकारणे (आपल्याला पटोत ना पटोत... त्याबद्दल चर्चा होऊ शकते;पण वारंवार अशी टर उडवणे निदान आपल्याला तरी शोभत नाही.) आपल्याला जड जाता नये.

--- सहमत आहे.