विशिष्ट भाषेचा म्हणून लिहिलेला शब्दकोश असा नसावा हे माझे मत आहे.
यामध्ये आपला आळशीपणाच नडतो असे मला वाटते. पळवाटा काढणे आपल्याला फारच चांगले जमते. भारतातील कोणत्याही शहरात ( विशेषत: पुण्यात ) निम्म्याहून अधिक वाहने उजव्या बाजूने चालत असतात कारण त्याना उजवीकडज्या अगदी जवळच्या ठिकाणी जायचे असते,त्याचप्रमाणे आपले विचार व्यक्त करायला जो शब्द आठवेल तो बेधडक वापरायचा त्यासाठी मराठीत प्रतिशब्द आहे की नाही याचा विचारही करायचा नाही हीच आपली प्रथा आहे. डो. प्र. न. जोशी यांच्याविषयी आदर राखूनही त्यांच्या अशा शब्दकोशाला सर्वमान्यता असेल असे वाटत नाही.