निव्वळ वृत्तपत्रांतच नव्हे, बातम्या रुपी विदुषकी वाहिन्यांवरही ते तुणतुणं वाजतंय.....
सुनीता /कल्पना किंवा इतर अनिवासी भारतीय, निवासी भारतीयांना अभिमानास्पद वाटण्या / न वाटण्याची कारणे असावीत.
भारतीय मूळ असले तरी त्यांनी भारतातल्या अवघड परिस्थितींतून वर येत जे यश (थोडेफार का होईना) परदेशी जाऊन कमावले; त्याबद्दल निश्चित कौतुक वाटायला हवे !
जन्मापासून ते सर्व शिक्षण परदेशी झाल्यावर फक्त भारतीय मूळ असल्याचे गुऱ्हाळ लावण्यात काय अर्थ आहे ?
ह्या निमित्ताने एक किस्सा आठवला तो नमूद करतो....
हैदराबादेच्या मेडीनोव्हा डायग्नॉस्टीक्स मधले डॉ. नागेश्वर रेड्डींबाबत आहे.  
भारताबाहेर, पाश्चिमात्य देशांत "वर्ल्ड इंडोस्कोपिस्ट्स कॉन्फ़रन्स" होती व त्यातल्या एका वर्कशॉप (कार्यशाळेला) डॉ. रेड्डींना ३ रुग्णांवर (त्यांच्या पद्धतीने उपचार करण्याचे तंत्रज्ञान दाखवणारे) प्रात्यक्षिक करण्यासाठी बोलावले होते. त्यासाठी त्यांना अडीच तासाचा अवधी (जगमान्य वेळेनुसार) देण्यात आला.  सोबत "व्हिडिओ कॉंफरन्सींग" सेवेचा वापर करून प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम देखील होता. ह्या सद्गृहस्थाने हे प्रात्यक्षिक इतक्या लीलया व सोप्या रितीने फक्त अर्ध्या पाऊण तासात करून दाखवले की उरलेल्या वेळेत "डेलीगेटसची" करमणूक कशी करावी हा प्रायोजकांना प्रश्न पडला ! 
सुनीता विल्यमस पेक्षा अश्या निष्णात व्यक्तीचे कौतुक मला भारतीय म्हणून जास्त वाटेल.