राष्ट्रपती पदासाठी नामांकित असलेल्या प्रतिभा पाटील या आमच्या जळगावच्या आहेत हे सांगायला खरंच किती अभिमान वाटतोय!!

महाराष्ट्राने आणि मराठी जनतेने प्रतिभा पाटलांकडून काही अपेक्षा ठेवाव्यात का?

*नक्कीच... मी स्वतः अब्दुल कलाम यांची चाहती आहे आणि त्यामुळे मला वाटते की त्यांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर आपण महाराष्ट्रकन्या प्रतिभाताईंकडून अपेक्षा ठेवू शकतो.

राष्ट्रपती पदासाठी त्या राजकीय आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम आहेतच....

 परंतु हे पद असावेच का म्हणाल तर माधव कुळकर्णी यांच्याप्रमाणे मलाही ते केवळ शोभा वाढवणारे किंवा राजकीय सोय वाटते.

* प्रतिभाताई पाटील यांच्याबद्दलचे माझे मत कोणत्याही प्रकारे biased नाही(माफ करावे. आयत्या वेळी biased साठी मराठी शब्द मिळाला नाही).