विशिष्ट भाषेचा म्हणून लिहिलेला शब्दकोश असा नसावा हे माझे मत आहे.
मग कसा असावा हे तुम्ही सांगितल्यास केल्यास शब्दकोशशास्त्रात (लेक्सिकोग्रफी) मौलिक भर पडेल असे वाटते.
डो. प्र. न. जोशी यांच्याविषयी आदर राखूनही त्यांच्या अशा शब्दकोशाला सर्वमान्यता असेल असे वाटत नाही.
आपला समज अतिशय चुकीचा आहे. डॉ. प्र. न. जोशींच्या शब्दकोशाला सर्वमान्यता आहे. तसेच, कुठलाच शब्दकोश हा कधीच परिपूर्ण असू शकत नाही आणि प्रत्येक शब्दकोशाचे वैशिष्ट्य वेगळे असते, हे लक्षात घ्यायला हवे. एक चांगला शब्दकोश घडवायला किमान शतक तरी जावे लागते आणि भरपूर पैसाही लागतो. हे एकट्या माणसाचे काम नाही, पिढ्यांना खपावे लागते. ऑक्सफर्डचा शब्दकोश ह्याचे एक उदाहरण.