मला वाटतं की ह्या दोन शब्दांचा अर्थाच्या दृष्टीने फारसा संबंध नसावा. सहसा, शास्त्रीय कलाविष्काराला अभिजात असं म्हटलं जातं. शास्त्रीय पेक्षा Classical हा शब्द अधिक योग्य आहे. जसे शेक्स्पिअर ची नाटके अभिजात म्हणता येतील. पण त्या शब्दाच्या वापराचा कलाकृतीच्या सकसतेशी संबंध आहे असे वाटत नाही. लता मंगेशकरांनी चित्रपटात म्हटलेली गाणी अभिजात नसली तरी वाईट नाहीत. त्यामुळे अभिजात ह्याचा अर्थ कलेचा एक प्रकार असा घेतला तर अधिक योग्य असे वाटते. अभिजात म्हणजेच चांगले आणि बाकी सर्व वाईट हा चुकीचा समज आहे असे वाटते.